♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लाचखोर न. प. मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; जळगाव जामोदमध्ये घडली घटना

MH 28 News Live, जळगाव जामोद ( अमोल भगत ) : आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर परिषद चे मुख्याधिकारी व विद्युत पर्यवेक्षक यांना रुपये १२ हजाराची लाच घेतांना रंगेहात सापळा रचून जाळ्यात अडकविले उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची तसविस सुरू होती.

सविस्तर माहिती की तक्रारदार हा नगरातील पथ दिव्याची देखभाल व दुरुस्ती च्या कामाचे माहे जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबरचे बिल तसेच त्याने केलेल्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून यातील न प चा लोकसेवक (नोकर) दीपक कैलास शेळके वय ३० वर्ष हा विद्युत पर्यवेक्षक वर्ग- ३ यांनी स्वतः साठी ६ हजार रुपये व आ लो से आकाश अविनाश डोईफोडे वय ३२ वर्षे मुख्याधिकारी वर्ग – २ अग्निशमन कॉटर जळगाव जामोद यांच्यासाठी रु ६ हजारची लाचेची मागणी करीत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या कडे तक्रार दाखल केली होती.

या संबंधी मुख्याधिकारी डोईफोडे यांची पडताडणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम विद्युत पर्यवेक्षक दिपक शेळके यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले सदरची कारवाई पो उप अधिक्षक शितल घोगरे ,पो निरीक्षक सचिन इंगळे,महेश भोपळे, सापळा पथक ए एस आय-भांगे,पो हे कॉ विलास साखरे, प्रवीण बैरागी,रवी दळवी,पो ना जगदीश पवार, विनोद लोखंडे, पो कॉ शैलेश सोनवणे, म पो कॉ स्वाती वाणी, ना पो कॉ नितीन शेटे ,पो कॉ अर्शद शेख सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी वरिष्ठ अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

सदर लोकसेवकांनी लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना ते राहत असलेल्या न प अग्निशमन विभागाच्या कॉर्टर कडे नेण्यात आले होते त्यानंतर पो स्टे मध्ये गुन्हा नोंद करण्याची तजवीज सुरु होती. हा सापळा यशस्वी झाल्यानंतर इतरही विभागात अशीच कारवाही होण्या विषयी खमंग चर्चा सुरू होती तर काही ठेकेदाराबाबत ही उलटसुलट संताप व्यक्त करत होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129