गुजरातेतील भंगार व्यापाऱ्याला भामट्यांनी घातला ८ लाखाचा गंडा; जळगाव जामोद तालुक्यातील घटना थांबता थांबेना
MH 28 News Live / जळगाव जामोद, ( अमोल भगत ) : तालुक्यामध्ये भंगार व्यापाऱ्यांची ४ अनोळखी इसमानी फसवणूक केल्याची तक्रार १९ डिसेंबर रोजी येथील पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. या तालुक्यामध्ये फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून दोन तीन दिवस अगोदर असलगाव जवळ दिवसाढवळ्या सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटले अश्या घटना दिवसेन दिवस वाढत आहेत. या संबंधित घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कूठे तरी कमी पडत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. पोलीसांनी अनेक वेळा प्रयत्न केले असतील परंतु काही बाहेरील राज्यांमधील भंगार व्यापारी या फसवणुकीचे बळी पडत आहेत.
कामरेजगाम जिल्हा सुरत राज्य गुजरात येथील भंगार व्यापारी चिराग सवजी रानपरिया व त्यांचा व्यावसायिक मित्र हे या तालुक्यातील हनवतखेड येथे स्कँप भंगार माल घेण्यासाठी आले होते. त्यांना आरोपी अजय नामक एक इसम व त्याचे तीन साथीदार यांनी भंगार माल न देता न दाखवता भंगार व्यापारी चिराग रानपरीया यांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला नगदी रक्कम २५ हजार ७०० व बँक अकाउंट मधून ६ लाख ८९ हजार व आणखी काही रक्कम असे एकुण ८ लाख ४८ हजार सातशे रुपये दिले. एवढी मोठी रक्कम भंगार न घेता देणे हे कोणालाच पटणारी नाही. परंतु संबंधित आरोपींनी भंगारचा माल न देता भंगार व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केली असे म्हणणे चुकीचे आहे असे नागरीक आपसात बोलत होते. नेमके भंगारची डील होती की अजून काही वेगळे प्रकरण आहे कारण भंगार घ्यायच्या पहिलेच पैसै दिले ह्यात काही तरी वेगळेच कारण असू शकते अशी चर्चा संपुर्ण तालुक्यात आहे.
सदर घटना १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास घडली. सदर घटनेची तक्रार भंगार व्यापारी चिराग सवजी रानपरिया यांनी स्थानीक पोलीस स्टेशनला दिली तक्रारीवरून आरोपी अजय व त्यांच्या तीन साथीदाराविरोधात कलम ३१८(४)३(५) भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button