” तर तुझा मस्साजोगचा सरपंच करू ” सरपंच पतीवर कळंबेश्वरात गावगुंडांचा प्राणघातक हल्ला; वाचा सविस्तर घटना
MH 28 News Live / मेहकर : तालुक्यातील कळंबेश्वर या गावात अवैध धंदे बंद केल्याने चवताळलेल्या गावगुंडांनी सरपंच पतीवर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कळंबेश्वर येथील सुभाष खुरद यांच्या पत्नी दोन वर्षांपासून सरपंच पदावर आहेत. त्या पदावर आल्यापासून त्यांनी गावात विविध विकासकामे सुरू केलीत. कामे सुरू करत असताना त्यांनी गावातील अवैध धंदेही बंद केले. त्यामुळे गावातीलच अवैध धंदे असलेल्या गुंडांनी त्यांच्या पतीला म्हणजेच सुभाष खुरद यांना अनेकदा धमक्याही दिल्या. परवा ३१ डिसेंबर रोजी गावातील एका वृद्ध महिलेच्या अंतिम संस्काराच्या आटोपून घरी परत जात असताना गावातील पाच गुंडांनी सुभाष खुरद यांच्यावर प्राण घातक हल्ला चढवत…”आमचे अवैध धंदे पुन्हा सुरू न करू दिल्यास आम्ही तुझा मस्साजोगचा सरपंच करू…!” अशी धमकी देऊन निघून गेले. या हल्ल्यात सुभाष खुर्द हे जखमी झाले असून त्यांच्या जवळील काही दागिने हल्लेखोरांनी लंपास केले. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पाच आरोपींवर कलम ३०९ (२) ,११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) BNS नुसार गुन्हे दाखल केले असून अद्यापही आरोपी फरार आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button