
अमरावतीतून सटकले देऊळगाव राजात अटकले… १ कोटी ४५ लाख पळवणाऱ्या कार चालकाला साथीदारांसह पोलिसांनी केले चपळाईने अटक
MH 28 News Live / चिखली : अमरावती शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये थांबलेल्या औरंगाबादच्या व्यापाऱ्याच्या चालकाने व्यापाऱ्याने १.४५ कोटीची रक्कम असलेल्या बॅग कारमध्ये ठेवताच चालक कार घेऊन फरार झाला होता. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हादाखल होताचगुन्हेशाखायुनिट २ च्या पथकाने तातडीने सुत्र हलवित मुख्य आरोपी चालकासह तिघांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली. विशेष म्हणजे तिन्ही आरोपींच्या ताब्यातून संपूर्ण रक्कम व कार सुध्दा जप्त करण्यात आली .
प्रवीण उर्फ पंडीत शेषराव केदार (२६), विकास बारकु वाघ (३२) दोन्ही रा. दिग्रस चौक, देऊरवाडा, जि. बुलढाणा, नितिन सजन इंगळे (२७) रा. भानखेडा, ता.चिखली, बुलढाणा अशी अटकेतील तिन्ही आरोपींची नावे आहेत. तर तक्रारकर्त्यांचे नाव राजेंद्र दामोधर शहा (५३) रा. छत्रपती संभाजीनगर असे आहे.
त्याचे असे घडले की या प्रकरणातील फिर्यादी राजेंद्र शहा हे छत्रपती संभाजीनगर येथील एका बड्या कंपनीत अकाऊंट शाखेत उच्च पदावर कार्यरत आहे. सोबतच ते मित्रांसह मिळून प्लॉट खरेदी, विक्रीचा व्यवसाय देखील करतात. राजेंद्र शहा हे ११ जानेवारी रोजी मित्रासह अमरावती शहरात प्लॉटची विक्री करण्यासाठी आले होते. त्यांनी येथील डीडीआर कार्यालयात दिवसभरात विविध ३५ जणांना प्लॉट विकले. तसेच राजेंद्र शहा यांनी काही स्थानिक मित्रांकडून त्यांच्या मुलाच्या लग्रासाठी ३० लाख रूपये उधार घेतलेहोते. त्यानुसार राजेंद्र शहा यांच्याकडे त्या दिवशी १ कोटी ४५ लाख ७१ हजार ५०० रूपयांची रक्कम जमा झाली होती. राजेंद्र शहा त्याच दिवशी रात्री त्यांच्या एमएच-४३-ऐएल- ३१६१ क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायर कारने परत जाणार होते. परंतु, रात्रीचा प्रवास त्यांनी टाळल्याने ते शहरातील बडया हॉटेलमध्ये थांबले. १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राजेंद्र शहा हे औरंगाबादला जाण्यासाठी निघाले तेंव्हा चालक प्रवीण केदार याला हॉटेलच्या रुम मध्ये बोलावून त्याच्या मदतीने तिन्ही बॅग खाली कारच्या डिकीत ठेवल्या. परंतु, शहा अन्य सामान आणण्यासाठी वर गेले असता चालक प्रवीण केदार हा अचानक कार घेऊन पळून गेला. शहा खाली आल्यानंतर प्रवीण गायब दिसताच त्यांनी प्रवीणला फोन लावला. प्रवीणचा फोन बंद आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता शहा यांनी तातडीने कोतवाली पोलिसांना माहिती दिली.
कोतवाली पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली असता कार हॉटेलच्या जवळील परिसरातच मिळाली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हेशाखा युनिट २ चेप्रमुख पीआय बाबाराव अवचार यांनी त्यांच्या पथकातील एपीआय मनीश वाकोडे, पीएसआय प्रकाश झोपाटे, विजय गिते, कॉस्टेबल सतीश देशमुख, फिरोज खान, मलीक अहमद, दिपक श्रीवास, सचिन बहाळे, विकास गुडधे, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, नाझीम, सायबर सेलचे एपीआय अनिकेत कासार, कॉस्टेबल निखिल माहुरे, अनिकेत वानखडे यांच्यासह मिळून गोपनीय व तांत्रिक पध्दतीने तपास सुरू केला. दरम्यान प्रवीण केदारचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील मिळाल्याने पोलिसांनी तातडीने देऊळगाव राजा गाठून प्रवीण केदारला अटक केली. विकास वाघ व नितिन इंगळे सोबत मिळून कॅशसह कार पळविल्याचा कट रचला असल्याचे प्रवीणने सांगताच पोलिसांनी विकास व नितिनला सुध्दा अटक केली. तिन्ही आरोपींच्या ताब्यातून संपूर्ण रक्कम व कार सुध्दा जप्त करण्यात आली.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button