♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जळगाव जामोद बनले गुटखा तस्करीचे प्रमूख केन्द्र; वनविभाग आणि पोलिसांचे अभय

MH 28 News Live / जळगाव जामोद ( अमोल भगत ) : महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवर सातपुडा पर्वत आहे. या पर्वतीय क्षेत्रातून जळगाव जामोदवरून पुढे जातांना एक वन विभागाची तर दुसरी पोलीस विभागाची अशा दोन चौक्या लागतात. एवढी कडे कोड चौकशी असून देखील या मार्गावरून मध्यप्रदेशामधून महाराष्ट्रात दिवसाढवळ्या गुटख्याची तस्करी सुरू आहे. ह्यात कूठे तरी त्यात स्थानिक पोलिस काहीच कार्यवाही करत का नाही ? असा सवाल साहजिकच उपस्थित होत असून या गुटखा तस्करीला वनविभागाने पोलीस दलाचे अभय असल्याची उघड चर्चा जळगाव जामोद परिसरात होत आहे.

महाराष्ट्रात गुटका बंदी कायदा असल्यावर सुध्या कोट्यावधी रुपयांचा गुटखा मध्य प्रदेशातून दिवसा राजरोसपणे वनविभाग व पोलिस विभागाचे अधिकारी हजर असताना त्याच्या समोरुन वाहनांमधून महाराष्ट्रात येतो. हे तस्कर टूणकी ( संग्रामपूर तालुका ), खामगांव व नांदुरा येथील रहिवाशी आहेत. चोरट्या मार्गाने आणलेला हा गुटखा गावोगावी असलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यात अवैधपणे विकला जातो.

असे चालते तस्करीचे रॅकेट

गुटखा तस्करीचे हे जाळे बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र पसरले असून संबंधित गाडी न MH 28 BB **25, MH 28 BB**03, MH 28 BB**81 ह्या नंबरच्या बोलेरो पिकअप MH 12 PQ **03 ही खाजगी ह्या गाड्या सर्रास अवैध गुटखा वाहतूक करताना दिसतात. याशिवाय त्याचे फेरीवाले सुध्या दिवसा उघडपणे मोटर सायकल वरून गावोगावी फिरून तसेच शहरातील प्रत्येक लहान मोठया किराणा दुकानावर, पान टपरीवर चहाच्या टपरीवर गुटख्याचा हा माल बिनदिक्कतपणे पोहचवतात

पोलिसांच्या नाकासमोर विकला जातो गुटखा

या गुटखा तस्करी मध्ये उल्लेखनीय बाब अशी की जळगाव जामोद शहरातील शहरातील पोलीस स्टेशनच्या २०० मीटरच्या आत दवाखाने, शाळा, महाविद्यालये यांच्या जवळ अगदी सहजपणे गुटक्याचे पाऊच विकले जातात. याचा परिणाम म्हणून शहरातील शाळकरी मुले सुध्या गुटख्याच्या आहारी जात आहेत. त्या मुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून याला वनविभाग आणि खास करून पोलीस विभाग जबाबदार असल्याचे उघड सत्य आहे स्पष्टपणे दिसत आहे. परंतु स्थानीक पोलीस ह्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळते. त्याचे कारणं सगळ्याचे मिळून लाखोंचे पॅकेज चालू आहे. या प्रकरणी पोस्टेमध्ये काही दिवसापर्वीच एक ट्रान्सपोर्टची गाडी गुटख्याचा गाडी दाखवण्याची पकडली होती. मागच्या वेळी सुध्या सुजाण नागरिकांनी अवैध गुटखा विक्रीचां ट्रक पकडला होता. सुजाण नागरिक पकडुन देतात मग पोलिस अधिकारी काय फक्त पैश्यापुरतेच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न सामान्य जनते विचारत आहे. ह्याकडे लोकप्रतिनिधींनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुध्या लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129