
चिमुकलीवर ५० रुपयांचं आमिष दाखवून नराधमाचा अतिप्रसंग; कामातुरानाम न भयम् न लज्जा…
MH 28 News Live : खामगाव : कामवासानेने पछाडलेल्या व्यक्तीला ना कशाची भीती वाटते ना कशाची त्याला लाज वाटते. तो कोणत्याही थराला उतरून आपली वाचनासमवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये वय, नाते आदी गोष्टींचा विचार देखील होत नाही. अशीच एक घटना खामगाव तालुक्यातून समोर आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.
खामगाव तालुक्यामधील पिंपळगावराजा येथील पेठ पुरा परिसरात राहणारी केवळ साडेनऊ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी रेहान खान मुक्तार खान (वय २४ ते २५) याचे अंडा आणि चिकन सेंटर असून चिमुकलीला ५० रुपयांचं आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला आई नसून वडील मोल मजुरीचं काम करतात.
घटनेतील आरोपी फरार झाला होता, त्याला शोधण्यासाठी तीन टीम रवाना करण्यात आल्या आणि नांदुरा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच चिमुकलीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती केलं असून वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.