
चिखलीत गोमांस विक्रीचा पर्दाफाश! सार्वजनिक ठिकाणी विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल; 59 हजारांचा मुद्देमाल जप्त
MH 28 News Live / चिखली : शहरातील अंगूरचा मळा परिसरात सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीररित्या गोवंश सदृश्यमासाची विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल करत तब्बल 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 6.50 ते 7.50 या वेळेत करण्यात आली. पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास चतरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेख मुजाहिद शेख शब्बीर (वय 38, रा. अंगूरचा मळा, चिखली) या इसमाने आपल्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेल्या ऑटो रिक्षातून अंदाजे 78 किलो गोवंश सदृश्यमासाची विक्री केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मिळालेल्या ऑटो रिक्षातून सुमारे 11,700 रुपयांचे मास, लोखंडी सुरा, लाकडी ठोकळा, इलेक्ट्रिक वजनकाटा व ऑटो रिक्षा असा एकूण 59,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्निल तायडे करीत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी कायद्याला धाब्यावर! गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कठोर कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत.