
रेती तस्करीचा हप्ता घेताना एएसआयचा पर्दाफाश — अकोला एसीबीची मोठी कारवाई ! मलकापूरात लाचखोरीचा भांडाफोड — एलसीबीचे एएसआय गजानन माळी 14 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
MH 28 News Live / मलकापूर : स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) गजानन माळी यांना 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही धडक कारवाई मलकापूर येथे करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, रेती तस्करीसंदर्भातील प्रकरणात माळी यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रार मिळताच एसीबीने सापळा रचून त्यांना अटक केली. या कारवाईदरम्यान त्यांच्यासोबत आणखी एक पोलीस कर्मचारी होता. मात्र, त्याचा लाच मागण्याशी थेट संबंध नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याची चौकशी सुरू आहे.
संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी सुरू असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही कारवाई अकोला एसीबीचे उप अधीक्षक बाहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.