
“Gemini Live” – तुमचा स्मार्टफोन झाला तुमचा संवादशील मित्र ! नवीन काय आहे ? कोणते फायदे आहेत? कसे वापरायचे ते या बातमीतून जाणून घ्या…
MH 28 News Live : आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाने मानवाचे जीवन अधिक स्मार्ट केले आहे. स्मार्टफोन युजरसाठी Google Gemini हा एक नवखा पण विश्वासू मित्र बनला आहे. या नव्या AI फिचरमुळे स्मार्टफोनचा वापर केवळ स्पर्शापुरता मर्यादित न राहता संवादात्मक झाला आहे.
Google I/O 2025 मध्ये गूगलने आपल्या AI प्रणालीतील नवीन पर्व उघडले – Gemini Live. हे फिचर वापरकर्त्याला आपल्या स्मार्टफोनसोबत अगदी माणसासारखं संवाद साधण्याची संधी देतंय.
Project Astra चा भाग असलेल्या या फिचरद्वारे स्मार्टफोन वापर अधिक नैसर्गिक, संवादात्मक व सोपा झाला आहे. केवळ टॅप किंवा आवाजाने, वापरकर्ता Google Calendar, Notes, Tasks व Maps यासारख्या अॅप्सचा वापर सहज करू शकतो.
Gemini Live मध्ये एक खास वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा आधारित अॅनालिसिस. तुम्ही एखाद्या वस्तूकडे कॅमेरा फिरवलात आणि स्क्रीनवर टॅप केलात, की फोन त्याबद्दल माहिती देतो. याशिवाय, बोलून रिमाइंडर लावणे, मीटिंग शेड्युल करणे, रस्ते शोधणे हे सुद्धा सहज शक्य आहे.
कसे वापरायचे?
Google Gemini अॅप डाऊनलोड करा
आवश्यक परवानग्या द्या
Gemini Live आयकॉन टॅप करा
कॅमेरा वापरायचा असल्यास कॅमेरा आयकॉनवर टॅप करा
संपूर्ण अनुभवासाठी Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध आहे. Gemini Live म्हणजे केवळ एक तंत्रज्ञान नव्हे, तर भविष्यातील संवादाची नवी दिशा आहे.