♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शास्त्रज्ञांनी माणसांना राहण्यायोग्य ग्रह शोधला, पृथ्वीपेक्षा अनेक पटीने मोठा

MH 28 News Live : येत्या काही काळात पृथ्वी ही उद्ध्वस्त होणार असल्याचं बोललं जात आहे. कारण, प्रत्येक ग्रहाला एक मर्यादित आयुष्य असतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ माणसांच्या राहण्यासाठी एका योग्य ग्रहाचा शोध घेत आहेत. शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे. पृथ्वीपासून ३१ प्रकाशवर्षे दूर अंतरावर एक एक्सोप्लॅनेट सापडला आहे, जिथे जीवन शक्य आहे. या ग्रहावर माणसांच्या राहण्यासाठी सर्व योग्य घटक आहेत. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी ५२०० हून अधिक एक्सोप्लॅनेट शोधले आहेत. त्यापैकी फक्त २०० असे आहेत जे माणसांच्या राहण्यायोग्य आहेत

WOLF 1069b असं या एक्सोप्लॅनेटचे नाव आहे. या ग्रहाला शोधण्यासाठी जगभरातील ५० शास्त्रज्ञांनी काम केलं. WOLF 1069b चा शोध अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे, कारण येथील जमीन खडकाळ आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा १.२६ पटीने जास्त आहे. तसेच, तो पृथ्वीपेक्षा १.०८ पट मोठा आहे. WOLF 1069b त्याच्या ताऱ्यापासून म्हणजे सूर्यापासून इतक्या अंतरावर आहे की तेथे जीवन शक्य आहे. तसेच, या ग्रहावर पाणी असण्याचीही शक्यता आहे.

WOLF 1069b ग्रहाचा जो काही अभ्यास आतापर्यंत केला आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की तेथे जीवन शक्य आहे, असं जर्मनीस्थित मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अॅस्ट्रॉनॉमीच्या शास्त्रज्ञ डायना कोसाकोव्स्की यांनी सांगितले. हा एक्सोप्लॅनेट १५.६ दिवसात आपल्या ताऱ्याभोवती फिरतो. बुध ग्रहाप्रमाणे तो आपल्या ताऱ्याच्या म्हणजे सूर्याच्या अगदी जवळ आहे. तो ८८ दिवसांतून एकदा सूर्याभोवती फिरतो. तेथील पृष्ठभागाचे तापमान हे ४३० अंश सेल्सिअस आहे. कारण, तो सूर्याच्या जवळ आहे. तरीही या ग्रहावर राहण्याोग्य तापमान आहे.

या ग्रहाचा सूर्य हा एक रेड ड्वार्फ आहे, म्हणजेच तो आपल्या सूर्यापेक्षा लहान आहे. इतकंच नाही तर तो सूर्याच्या तुलनेत ६५ टक्के कमी रेडिएशनची निर्मिती करतो. त्यामुळे या एक्सोप्लॅनेटवर राहाण शक्य आहे. WOLF 1069b च्या पृष्ठभागाचे तापमान ९५.१५ अंश सेल्सिअस ते १२.८५ अंश सेल्सिअस असते. सरासरी तापमान ४०.१४ अंश सेल्सिअस आहे. म्हणजेच तापमानानुसार या ग्रहावर जीवन शक्य आहे. या ग्रहावर एका बाजूला नेहमी प्रकाश असतो तर एका बाजूला नेहमी अंधार असतो. त्यामुळे या ग्रहावर दिवस-रात्र हे सूत्र नाही.

WOLF 1069b चा शोध CARMENES दुर्बिणीने लागला आहे. ही ११.५ फूट उंचीची दुर्बीण स्पेनमधील कॅलर अल्टो वेधशाळेत आहे. WOLF 1069b हा पृथ्वीजवळ सापडलेला सहावा राहण्यायोग्य ग्रह आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129