♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रोजगार वार्ता – SBI मध्ये आहे अधिकारी पदावर नोकरीची संधी. ३१ मार्चपर्यंत करा अर्ज

MH 28 News Live : सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सची भरती करण्यात येत आहे.

इच्छुक उमेदवार ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने www.sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात. चार मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे मुख्य माहिती अधिकारी १, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी १ आणि उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी २ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

महत्त्वाची माहिती

– ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात : ४ मार्च

– ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च

येथे जाणून घ्या योग्यता –

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर या पदांवर भरती होण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेशी संबंधित विषयात बॅचलर किंवा मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे.

कशी होईल निवड

या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी एसबीआय स्पेशालिस्ट केडर ऑफिसर रिक्रूटमेंट २०२२ साठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in भेट देऊन अधिसूचनेची संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे.

वयाची अट

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर इतर पदांसाठी कमाल वय ५५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. उमेदवार तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129