
गळफास घेऊन इसमाची आत्महत्या, चिखली तालुक्यात घडला प्रकार
MH 28 News Live / चिखली : शहराला लागूनच असलेल्या खामगामार्गावरील शेलुद येथे आज दि. २७ मे रोजी एका इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. श्याम रामदास सवडे वय ( ३६ ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याने आपला चुलत भाऊ विष्णू सवडे यांच्या शेतातील झाडाला गळफास लावून दुपारी २ वाजता आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद लिंबाजी गोविंदा सवडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. शाम सवडे यांच्या आत्महत्येबद्दल अधिक तपास चिखली पोलीस करत असून त्या संदर्भात चिखली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.