
आँनलाईन लाँटरीवर चिखलीत छापा; एकास अटक, २० हजाराचा मुद्देमाल जप्त
MH 28 News Live, चिखली : शहरात अवैध धंदे बोकाळले असताना चिखली पोलिसांनी काल एका आँनलाईन लाँटरी सेंटरवर कारवाई केली. या छाप्यात दुकानाच्या नोकरास अटक करून पोलिसांनी २० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत माहिती अशी आहे की, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे हे पोहेकाँ भांडेकर आणि शिपाई जाधव यांच्यासह दि. ३ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना
शेख चांद शेख लाल वय 42 वर्ष व शेख शकिल मतीन वय 40 वर्ष दोन्ही रा.चिखली याचे विरुध्द लाँटरी नियम अधीनियम कलम 4 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ ) अन्वये गुन्हा दाखल करणे बाबतमहोदय, त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती प्राप्त झाली की, एक इसम आठवडी बाजार परिसरात जिंदा शहा दर्ग्याजवळ आँनलाइन लाँटरी जुगार पैश्याचा हार जित खेळत व खेळवीत आहे. प्राप्त माहीतीवरुन स्टेशन डायरीला नोंद घेतली.
पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशानुसार दोन पंचाना बोलावून सदर आँनलाईन लाँटरी सेंटरवर छापा टाकला. यावेळी आँनलाइन जुगार खेळवणारा इसम मिळुन आला.
पोलीसांना पाहुन इतर लोक पळुन गेले. पकडलेल्या इसमास पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख चांद शेख लाल वय ४२ वर्ष रा.अंगुरचा मळा चिखली असे असून तो नोकर असल्याचे त्याने सांगितले; तर मालकाचे नाव त्याने शेख शकिल शेख मतीन वय ४० वर्ष रा. गांधी नगर असे सांगितले. पंचासमक्ष सदरची आँनलाइन लाँटरी कशी चालते अशी विचारणा केली असता त्याने सदरचे आँनलाइन जुगार ० ते ९९ या आकडयावर खेळला व खेळवला जातो, सदरची सोडत ही १५ मिनीटांनी येत असते १० रुपये लावल्यास जर आकड आल्यास १००० रुपये जिंकले जातात. यामध्ये शासनास कोणताही कर दिला जात नाही अशी माहिती दिली. यावरुन येथे अवैधपणे आँनलाइन जुगार खेळवला जात असल्याचे स्पष्ट झाले.
अटक केलेल्या इसमाकडुन पोलीसांनी आँनलाइन जुगार साहित्य पंचासमक्ष जप्त केले. शेख चांद शेख लाल वय ४२ वर्ष याचे ताब्यातुन (१) इ प्रो कंपनीचा सी.पी.यु. अंदाजे कि. ८५०० रुपये. एल.जी.कंपनीचा माँनीटर अंदोजे ४२०० रुपये, फोक्सीन कंपनीचा किबोर्ड अंदाजे किंमत ६०० रुपये, एक लोकल कंपनीचे नाव नसलेला माउस अंदाजे किंमत ३०० रुपये, व्होडाफोन कंपनीचा डोंगल ज्याचा माँडेल नंबर . के. ४२०१ आय अंदाजे किंमत २००० रूपये, सिटीझेन कंपनीचे कँलक्युलेटर अंदाजे किंमत ६० रुपये, कार्बन, कोरे कागद,बाँल पेन व फाँर अँम्युसमेंट आन्ली अशा प्रिंटेड चिठ्ठया किमत १० रुपये, फायबरच्या दोन तुटलेल्या जुन्या खुर्च्या अंदाजे किंमत ३०० रुपये, १ मोठा शुभलक्ष्मी नावाचा कागदी चार्ट ज्यावर स्केच पेनाने वेगवेगळे आकडे लिहीलेले अंदाजे किंमत 00 रुपये, काँम्पुटरला जोडलेला काळया रंगाचा केबल किंमत १५० रुपये, बुलेट कंपनीचे स्कँनर अंदाजे किंमत ६०० रुपये, स्टार कंपनीचा थर्मल प्रिंटर अंदाजे किमत ३००० रुपये, अंग झडती मध्ये मिळालेली नगदी रक्कम ११५० रुपये असा एकूण नगदी व साहित्यासह २०८७० रुपयाचा मुद्येमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
शेख चांद शेख लाल वय व शेख शकिल शेख मतीन यांच्या विरोधात लाँटरी नियम अधिनियम कलम ४ व महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ अन्वये करून शेख चांद शेख लाल यास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



