
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची बदली करा; डोणगावच्या नागरीकांची तक्रार
MH 28 News Live / डोणगाव : येथील विदयूत वितरण कंपनीमध्ये कार्यरत असणारे डोणगाव येथील मुळ रहिवासी असणारे तीन विद्युत कर्मचारी यांची डोणगाव येथून त्वरित बदली करून त्यांना इतरत्र देण्यात यावे अशी मागणी डोणगाव येथील जवळपास १०० नागरीकांनी उपकार्यकारी अभियंता मेहकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्यांनी आपल्या तक्रारीत , स्थानिक विद्युत कर्मचारी अख्तरखान गफ्फारखान व शेख सादीक शेख मदार हे दोघे डोणगांव येथील रहीवासी असून ते डोणगांव येथील विद्युत कार्यालयात नियमीत कर्मचारी आहेत. तसेब नावेद शाह उस्मान शाह हा आऊटसोसींग म्हणुन काम करीत आहे. सदरील तीनही कर्मचारी स्थानिक रहीवासी असल्याने ते ग्राहकाशी अरेरावीची भाषा वापरतात, साधा वायर जरी जोडला तर अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. तसेच बिल भरण्यास विलंब झाल्यास कुठल्याही प्रकारची पुर्वसुचना न देता लाईन कट करतात. व ग्राहकांना धमक्या देतात की, तुमच्याकडुन जे होईल ते करुन घ्या, सर्व अधिकारी आमच्या खिशात आहेत. त्यामुळे डोणगांव येथील विद्युत ग्राहक त्रस्त झालेले आहेत. तसेच वरील कर्मचारी हे एकाच समाजाचे असल्याने ते दुसऱ्या समाजाच्या ग्राहकांना जाणीवपुर्वक त्रास देतात. जसे की मीटर अर्ज केला असता मिटर येवून कार्यालयात पडलेले असते, परंतु ते लावण्यासाठी ज्यादा रक्कम मागणे, साधा वायर जरी तुटलेला असल्यास त्यास विलंब करणे, अरेरावीची भाषा वापरणे, असे एक ना अनेक उदाहरणे देता येतील. या कर्मचाऱ्यांमुळे इतर समाजातील ग्राहक त्रस्त झालेले आहेत. वरील तीनही कर्मचाऱ्यांची डोणगांव महावितरण कार्यालयामधुन तात्काळ बदली करावी असे न झाल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असे नमुद आहे.
सदर निवेदनावर सज्जन आखाडे, वैभव आखाडे, गणेश ठाकुर, प्रवीण वानखेडे, जावेद खान, मोहमद इर्शोद, मो. खालीक, सुरेंद्र चव्हाण, राजू, वाघमारे, महावीर मोरे, अर्जुन भुजबळ सह जवळपास १०० नागरीकाच्या सह्या आहेत. डोणगाव येथील अनेक कर्मचारी कागदोपत्री कामावर हजर आहेत. प्रत्यक्ष खाजगी कर्मचारी गावात विदयूत चे काम करताना दिसत आहेत यांची ही चौकशी होणे गरजेचे आहे.