♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली आढळले अनोखी इसमाचे प्रेत, पोलीस करताहेत तपास…

MH 28 News Live, चिखली : येथील गवळीपुरा परिसरातील बजाज शोरूमच्या पश्चिमेकडील सिमेंट रोडवर दि. १८ एप्रिल रोजी चिखली पोलिसांना एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळले. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याची ओळख पटवण्यासाठी चिखली पोलीस तपास करत आहेत.

गवळीपुरा भागात एक इसम मृत अवस्थेत पडलेला आहे अशी माहीती १८ एप्रिलला मिळाल्यावरून डयुटी ऑफीसर पोहेका निवृत्ती चेके, शिवानंद तांबेकर आणि राजकुमार भोयर
हे सकाळी साडेनऊ वाजता घटनास्थळी पोहचले. तेथे अंदाजे 40 ते 45 वर्षे वयाच्या इसमाचे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत उत्तरेकडे डोके व पाय दक्षिणेकडे अश्या स्थितीत प्रेत पडलेले मिळून आले. या बाबत पोहेका. निवृत्ती चेके यांच्या रिपोर्टवरून आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकदंरीत तपासात यातील अनोळखी व्यक्ती ही दि. 17/04/2022 चे सायंकाळी 18.00 ते दि. 18/04/2022 चे सकाळी 09.00 वा. दरम्यान मरण पावली आहे. सदर अनोळखी इसमाचे नाव व पत्ता माहीती नसल्याने ओळख पटवण्यासाठी त्याचे प्रेत ग्रामीण रुग्णालय चिखली येथे शवागारात ठेवण्यात आले आहे. अंदाजे 40 ते 45 वर्षे, बांधा-सडपातळ रंग गव्हाळ वर्ण, उंची अंदाजे 5 ते 5.5 फुट केस काळे व मध्यम ठेवण अंगात फिकट गुलाबी रंगाचे फुलबाहयाचे शर्ट, काळसर रंगाचा फुलपॅन्ट, लालसर रंगाची हाफ बाहयाचे बनियन, भुरकट रंगाची अंडरविअर, गळयात काळे रंगाचा धागा, प्रेताचे उजवे हातावर आनंदसिंह तसेच छातीवर उजवे बाजुला माँ असे गोंदलेले आहे. तरी सदर वर्णणाची व्यक्ती मिसींग असल्यास 07264-242067 पोलीस ठाणे, चिखली, तपास अधिकारी पोहेका निवृत्ती चेके 9011228405, 9922952877 किंवा पो. नि. अशोक लांडे, ठाणेदार, चिखली यांच्या 9822057936 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चिखली पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129