♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ त्या ‘ सोशल मीडिया कार्यकर्त्याला पक्षाने दिली अनोखी भेट; जळगाव जामोदमध्ये असा साजरा झाला भाजपा स्थापना दिवस

MH 28 News Live, जळगाव जामोद : अमोल ढगे या युवा कार्यकर्त्यांचा केवळ सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक पोस्ट टाकल्यामुळे जप्त केलेला मोबाईल दीड वर्ष उलटूनही पोलीस प्रशासनाने चौकशीच्या नावाखाली अजूनही परत दिला नाही. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाने त्याला नवीन मोबाईल भेट म्हणून दिला. भाजपा स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यातून भाजपा हा नुसता पक्ष नसून एक परिवार असल्याचे आज दिसून आले.

भारतीय जनता पार्टीची स्थापना होऊन आज ४२ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आ. डॉ संजय कुटे यांनी केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजना ह्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे असे मनोगत व्यक्त केले. यानंतर त्यांच्या निवासस्थनी स्क्रीन लावून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन कार्यकर्त्यांनी ऐकले. या अगोदर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपा पक्षाचा झेंडा लावून ” मला अभिमान आहे मी भाजपचा आहे ” असा विश्वास व्यक्त करीत या उद्बोधन कार्यक्रमास उपस्थीत झाले.

या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल, जि. प. विरोधी पक्ष नेता बंडू पाटील, माजी नगराध्यक्ष सीमा डोबे, अपर्णा कुटे, चंदा पुंडे, लता तायडे, सुचेता उमाळे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश राठी, अविनाश धर्माळ, रामदास म्हसाळ, विठ्ठल वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख, युवा मोर्चा उपाध्यक्ष राम इंगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश येउल, माजी नगरसेवक शैलेंद्र बोराडे, आशिष सारसर, निलेश शर्मा, रमेश कोथळकार, शरद खवणे, अरुण खिरोडकार, नाना धंदर, अंबादास शेळके, बाळू कुटे, डॉ प्रकाश बगाडे, गणेश अप्पा सोनटक्के, गोटू खत्ती, सखाराम ताडे, कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, सुनील रघुवंशी, अजय वंडाळे, मोहित सरप, गणेश दांडगे, करणसिंग राजपूत, अमोल भगत, रामू खोंड, अमोल ढगे, अजय धर्मे, सतीश फुसे, रितेश आव्हेकर, शुभम चंडाले यांचा सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129