♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” तुला बंदुकीने उडवून टाकू…! ” न. प. अभियंत्याने धमकी दिल्याची तक्रार करत फिर्यादीने केला आत्मदहनाचा प्रयत्न

MH 28 News Live, बुलडाणा : मागण्यात आलेल्या नवीन घर बांधकामाच्या परवानगीसाठी बुलडाणा नगर परिषदेच्या बांधकाम अभियंता योगेश देशमुख यांनी पैश्याची मागणी करत फोनवरून अश्लील शिविगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली असा आरोप करत आत्मदहन करण्याचा हाजी मोहम्मद अकिल केला.

 

ठाणेदाराकडे सादर केलेल्या लेखी तक्रारीत हाजी मोहम्मद अकिल यांनी देशमुख यांच्या आपल्याला मारण्याची धमकी देत तुला फिर्याद देवून आत्मदहन बंदुकीने उडवून टाकू, तुझा तपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्ता पण लागू देणार नाही असे नमस्कार केले आहे. बुलडाणा पोलिसांनी या फिर्यादला सध्या चौकशीवर ठेवले आहे. दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. आपल्या तक्रारीत अकिल यांनी पुढे म्हटले आहे की, घर बांधकाम परवानगीसाठी २२ फेब्रुवारी रोजी बुलडाणा नगर परिषदेकडे अर्ज दिला होता. बांधकाम अभियंता इंगळे यांच्याकडे अर्जाची तपासणी नंतर परवानगीसाठी लागणारी पहिली ‘फी’ २६ फेब्रुवारी रोजी भरली. त्यानंतर परवानगीची फाईल अभियंता योगेश देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर याबाबत विचारपूस करण्यासाठी अभियंता देशमुख यांच्याकडे गेल्यावर त्यांनी माझ्याशी उद्घट वागणूक दिली व परत पाठवून दिले. त्यानंतर दोन ते तीनदा अभियंता देशमुख यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांची भेट झाली नाही. दरम्यान नगर परिषदेमध्ये अभियंता देशमुख यांना भेटल्यावर त्यांनी सांगितले की, तुम्ही पैशे द्या, तेव्हाच तुमचा काम होईल, नाहीतर तुमचं काम होणार नाही, असे सांगून त्यांनी परत पाठवून दिले.

 

यानंतर ८ मार्च रोजी नगरसेविका यांचे पती मो. अजहर यांचा फोन आला. त्यांनी विचारले परवानगीचे तुमचं काम झाला का. झालं नसेल तर तुम्ही नगर परिषदेत या. तुमचं काम करून देतो. त्यामुळे मी त्याच दिवशी नगर परिषदेमध्ये आलो आणि मो. अजहर यांच्याशी भेटलो असता मो. अजहर यांनी अभियंता योगेश देशमुख यांना फोन लावून माझे बोलणे करून दिले असता यावेळी योगेश देशमुख यांनी मला अश्लील शिवीगाळ करून मला जिवाने ठार मारण्याची धमकी देत सांगितले, तुला बंदुकीने उडवून टाकू. तुझा पत्ता पण लागू देणार नाही. अशी धमकी दिल्याने माझी मानसिक स्थिती बिघडल्याने मी अंगावर रॉकेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

 

यावेळी माझ्या हातातील रॉकेल नगरसेविका यांचे पती समाजसेवक मोहम्मद अजहर व उपस्थित लोकांनी हिसकावून घेतले. माझ्यावर अन्याय झाल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता, कोणतीही चौकशी न करता उलटपक्षी माझ्या विरुद्ध तक्रार दिली व माझ्यासोबत अन्याय केला आहे. त्यामुळे मला न्याय देण्यात यावे अशी मागणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हाजी मो. अकिल यांनी लेखी फिर्यादीत बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना दिले आहे.

 

काही वर्षांअगोदर अभियंता योगेश देशमुख यांनी आपल्या वॉट्सप स्टेटसवर हातात बंदूक धरून फोटो अपलोड केले होते. त्यावेळी आणि आता आता आत्मदहन करणाऱ्या हाजी मो. अकिल यांना बंदुकीने ठार करण्याची अभियंता देशमुख यांनी धमकी दिल्याची लेखी फिर्याद पोलिसात दाखल झाल्यामुळे अभियंता योगेश देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दाखल झालेल्या लेखी फिर्यादमुळे सुरू झालेल्या चौकशीत पोलीस काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129