
” दर्शनाचि ये प्रशस्ती पुण्यपुरुष ” दिगंबर महाराज पितळे चरित्राचे झाले प्रकाशन
MH 28 News Live, चिखली : वैकुंठवासी प्रा.नाथ महाराज पितळे यांनी हंस सांप्रदायाचार्य श्री दिगंबर महाराज पितळे, ज्ञान मंदिर, मेहकर यांच्या जीवनकार्यावर लिहिलेल्या व संपादित केलेल्या ” दर्शनाचि ये प्रशस्ती पुण्यपुरुष ” या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन पंचमुखी महादेव मंदिर, जालना येथे करण्यात आले.
हंस सांप्रदायाचार्य देवदत्त महाराज पितळे, ह.भ. प. नाना महाराज पोखरीकर, गुरुभक्त देविदास काकड गुरुजी यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. या चरित्र ग्रंथाचे लेखक व संपादक स्व. प्रा. नाथ महाराज पितळे यांनी दिगंबर महाराज यांच्या जीवनकार्यावर यथोचित विवेचन केले असून या चरित्रातून साधकांना आध्यात्मिक अनुभूती आणि सांसारिक जीवनाच्या मार्गदर्शनाचा निश्चित लाभ होईल असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत महाजन यांनी केले. श्वासानंद उपासना मंडळ जालना व समस्त श्वासानंद परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्वासानंद परिवारातील सर्व गुरु भक्त या प्रसंगी उपस्थित होते. होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button