♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दिलासा… व्यवसाय कराचे विवरण पत्रकावरील विलंब शुल्क माफ. व्यावसायिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन

MH 28 News Live, बुलडाणा : गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे डबघाईस आलेल्या व्यवसायांना व व्यावसायिकांना शासनाने व्यवसाय कराचे विवरण पत्रकावरील विलंब शुल्क (LATE FEE ) माफ करून मोठा दिलासा दिलेला आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त व्यावसायिकांना घेण्याचे आवाहन व्यवसाय कर अधिकारी श्रीमती शीतल पडोळ यांनी केले आहे.

व्यवसायांकर कायदा १९७५ अन्वये शासनाने २५ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करून व्यवसाय कर कायदा अंतर्गत भरावे लागणारे मासिक आणि वार्षिक विवरणपत्रावरील विलंब शुल्क (LATE FEE) माफ केलेली आहे विवरणपत्र हे नियमित कालावधीमध्ये भरणे आवश्यक असतात. अन्यथा 30 दिवसापर्यंतच्या विलंबासाठी २०० रूपये व त्यानंतरच्या विलंबासाठी १ हजार रूपये इतके विलंब शुल्क प्रत्येक विवरणाकरिता (RETURN) आकारले जाते. परंतू अनेक व्यावसायिक कोरोनाच्या संकटामुळे विवरणपत्र भरणा करू शकले नाही, त्यांचेसाठी ही सुवर्ण संधी आहे.

डिसेंबर २०२१ पर्यंतच्या कोणत्याही कालावधीचे देय व्यवसाय कर व व्याजाचा भरणा करून विवरणपत्रके ३१ मार्च पर्यंत दाखल केल्यास विलंब शुल्क माफी लागू राहील. व्यवसायकर विवरणपत्रके दाखल करण्यासाठीच्या विलंब शुल्क (LATE FEE) माफीच्या योजनेचा लाभ घेवून प्रलंबित विवरणपत्रे सर्व आस्थापना, व्यावसायिक व व्यापारी लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन व्यवसाय कर अधिकारी श्रीमती पडोळ यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129