♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्रमदानातून केली स्मशानभूमीची स्वच्छता. चिखलीतील राऊतवाडी परिसरात राबवला उपक्रम

MH 28 News Live, चिखली : मानवी जीवनाचा जेथे शेवट होतो ती जागा म्हणजे स्मशानभूमी. कुणी त्याला मुक्तिधाम म्हणतात तर कुणी वैकुंठधाम. अशी ही स्मशानभूमी प्रत्येकाच्या आयुष्यातील एक जळजळीत असे वास्तव आहे. परंतु, रुक्ष समजल्या जाणाऱ्या या स्मशानभूमीला सुंदर बनवण्याचे कार्य चिखलीतील काही लोकांनी घेतले असून स्थानिक राऊतवाडी स्मशानभूमीचे सामूहिक श्रमदानातून व सामूहिक योगदानातून स्वछता अभियान राबवण्याचा करण्याचा उपक्रम स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी चालवला आहे.

शहरातील राऊतवाडी परिसरात असलेल्या स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी संत गजानन महाराज भक्त मंडळ व नवयुवक मंडळ यांनी आज श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवले.
बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित झालेली राऊतवाडी स्मशानभूमी प्रा. नीलेश गावंडे यांच्या कल्पकतेतून सुसज्ज नावारूपास आली.

श्रमदानातून स्वच्छता हा मंत्र घेऊन स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक सेवाधार्यांनी संकल्प केला. त्यानुसार दर रविवारी स्मशानभूमी स्वच्छतेसाठी सकाळी श्रमदान करण्याचा हा कार्यक्रम असाच अविरत सुरू सुरू ठेवू अशी प्रतिज्ञा या केली आहे.

यासाठी प्राचार्य नीलेश गावंडे व सुनील मोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पवार, गजानन बांडे, शिवा राजपूत, कैलास सपकाळ, सचिन पडघान चेतन माळी, दीपक केसकर, सचिन चिंचोले, अनिकेत तायडे, मंगेश भुतेकर, नीलेश खरात, नीलेश सोनुने यांनी परिश्रम घेतले. श्रमदानासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपले मुक्तिधाम स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी निलेश गावंडेसह सर्व टीमच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129