♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

१७ वर्षीय मुलीचे अपहरण! हातणीच्या तरुणाविरुद्ध गुन्हा;

MH 28 News Live, साखरखेर्डा : बारावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन येथे समोर आली आहे. याप्रकरणी काल, ८ एप्रिल रोजी मुलीच्या आईने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हातणी (ता. चिखली) येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेंदूर्जन येथील १७ वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बारावीची परीक्षा देण्यासाठी गावातीलच संस्कार महाविद्यालय येथे गेली होती. पेपर झाल्यानंतर बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती परत आली नाही. दरम्यान पेपर झाल्यानंतर ती दुपारी २ वाजता हातणी येथील सागर संजय मोरे याच्यासोबत गेल्याचे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. त्यामुळे सागर मोरे यानेच तिचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सागर मोरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129