♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चक्रधरस्वामी अवतार दिन व अष्टशताब्दी महोत्सव मेहकरमध्ये साजरा

MH 28 News Live, मेहकर : महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामीच्या अवतार कार्याला ८०० वर्षे पूर्ण झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात स्वामींची अष्टशताब्दी महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. मेहकर येथे देखील हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समाजाला सत्य, अहींसा, मानवता व समानता ही मुल्ये दिली, मराठी साहीत्यात महानुभावांचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात व जगभरात मोठ्या प्रमाणात महानुभव उपासक आहेत. द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे, चक्रधरस्वामी हे कलियुगात बाराव्या शतकातील ईश्वर अवतार आहेत अशी महानुभाव पंथाच्या अनुयायांची श्रद्धा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन मेहकर येथील श्रीकृष्ण मंदिरात दि. 28 ऑगस्ट रोजी धार्मिक परंपरेनुसार साजरा झाला. सकाळी सामुहीक नामस्मरण, पारायण, पालखी सोहळा, आरती झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाचा समारोप करण्यात आला. सर्वज्ञ युवा मित्र मंडळ, तथा भाविक मंडळींनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Check Also
Close
Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129