♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीमध्ये अपघात बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

MH 28 News Live / चिखली : चिखलीहून तेल्हारा येथे आपल्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शंकर भोपळे (वय ४०, रा. तेल्हारा पेठ) यांचा सोमठाणा फाटा, चिखली-खामगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सोमवार दि 12 मे दुपारी 1 वाजेच्या  सुमारास घडला.

शंकर भोपळे हे एच एफ डिलक्स (HF Deluxe) दुचाकीवरून चिखलीहून आपल्या गावी तेल्हारा जात होते. दरम्यान, सोमठाणा फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या MH 08 एस 8786 बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोपळे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत केली मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129