
टेबल टेनिसच्या तिन्ही गटात चैतन्य गुरुकुलची विभाग स्तरावर निवड
MH 28 News Live / चिखली : क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा येथे दिनांक १५ सप्टेंबर रोजी आयोजित सर्व गटाच्या टेबल टेनिस स्पर्धेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चैतन्य गुरुकुल शाळेची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे .शाळेतील अंडर १४, अंडर १७ व अंडर १९ मधील मुलींच्या तिन्ही संघाने जिल्ह्यास्तरावर विजय मिळवून यवतमाळ येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर खेळण्यास आपले स्थान निश्चित केले आहे.

अंडर १४ गटात तेजस्विनी कासरे ,कु.माधवी चौधरी ,कु.प्राची बचाटे , कु.प्रगती गोलांडे , कु.अवंतिका सोनुने अंडर १७ गटात कु. विद्याक्षी पोहरकर , कु.स्वरा इरले , कु.ऋतुजा चेके , कु.स्वरा झाल्टे, कु. सृष्टी रिंढे तर अंडर 19 संघात कु.सई देशमुख ,कु. श्रावणी भुतेकर, कु.भक्ती डोईफोडे ,कु.देवयानी सोनुने आणि कु .उत्कर्षा केंधेळे या विद्यार्थीनीचा समावेश होता . या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून शाळेच्या क्रीडा इतिहासात अभिमानाची नोंद करीत शाळेतील मुलींच्या टेबल टेनिस संघाने उत्तुंग यशाची नोंद केली आहे. या विजयानंतर संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण असून आगामी विभागीय स्पर्धेतही खेळाडू यश मिळवतील असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे.



