
पूर्णा नदीत उलगडली शोकांतिका; मायलेकींचा दुर्दैवी अंत
MH 28 News Live / सिंदखेड राजा : तालुक्यातील देवखेड येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील गीता निळकंठ भोसले (२८) ही विवाहिता आणि तिची लहान मुलगी प्रियांशी (४) या २९ सप्टेंबर रोजी रात्री घरातून बाहेर पडल्या मात्र त्यानंतर त्या परतल्या नाहीत. दोन दिवसांच्या शोधानंतर त्यांचे मृतदेह मराठवाड्यातील तळणी पोलिस स्टेशन हद्दीतील पूर्णा नदीपात्रात आढळून आले.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मायलेकींचे अकस्मात झालेले निधन परिसराला हादरवून टाकणारे ठरले आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गावात आणि परिसरात या घटनेची तीव्र चर्चा सुरू असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या या शोकांतिकेने परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.



