♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महिलेचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ पसरवणारा नराधम लोणारमध्ये जेरबंद

MH 28 News Live / लोणार (राहुल सरदार) : महिलेचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲपवर प्रसारित करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला लोणार पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीबी (जि. बुलढाणा) येथील एका महिलेने तक्रार दिली होती की, तिच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. आरोपीने हे व्हिडिओ पीडित महिलेसह गावातील इतर महिलांना व्हॉट्सॲपवर पाठवले होते. इतकेच नाही तर, आपली ओळख लपवून आरोपीने महिलांना नग्न व्हिडिओ कॉल देखील केले होते. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण होते. महिलेच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी तांत्रिक तपास चक्रे फिरवली.

तपासाअंती रवि गजानन वायाळ (वय २१, रा. खळेगाव, ता. लोणार) याला निष्पन्न करून दि. ०८ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला २०,५०० रुपये किमतीचा ‘One Plus’ कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तपासात पो.नि. प्रकाश सदगीर, पोकाँ गणेश लोढे, अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर सायबर सेलचे राजू आडवे आणि पवन मखमले यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129