♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

देऊळगाव मही परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सोलरचे नुकसान

MH 28 News Live / देऊळगाव मही : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे देऊळगाव मही शिवारात शेतकऱ्यांच्या सोलर पंपाचे नुकसान झाले. देऊळगाव मही परिसरात १८ जुलै रोजी पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मेगगर्जनासह अत्यंत हलक्या स्वरूपाच्या किरकोळ पाऊस पडला. वादळी वाऱ्याने असंख्य शेतकऱ्यांचे शेतातील सोलर पॅनलवरती झाडे पडून शेडच्या छपराचे अतोनात नुकसान झाले. हवामान विभागाने यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून. परिसरातील कपाशी, सोयाबीन पिकाची लागवड झाली असून विहिरीच्या पाण्यावर व सोलरची व्यवस्था आहे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन व कपाशी लागवड करण्यासाठी सोलर पंप ची झालेली नुकसान लक्षात घेता, शेतकऱ्याना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129