♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मतदार यादी पुनरीक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर घराघरात पडताळणी मोहीम १७ ऑगस्टपर्यंत २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादीचे प्रकाशन

MH 28 News Live / बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली.

मतदार यादीचा प्रारूप मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोग मार्फत कळविण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129