
” तुम्हाला गावाबाहेर हाकलून देऊ ” म्हणत त्यांनी महिलेला केली जातिवाचक शिवीगाळ व विनयभंग; तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
MH 28 News Live / देऊळगाव राजा : सायकलचे पैसे मागितले म्हणून चिडून जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून फिर्यादी महिलांवर त्याच्या पती लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी महिलेचे वाईट उद्देशाने पदर उडून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील सावखेड भोई येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी तिघा विरुद्ध गुन्हा नोंदवला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सावखेड भोई येथील सविता किशोर डोंगरे यांच्या पतीचे सायकलचे पैसे गावातील बाबुराव राऊत यांच्याकडे उधार होते. वारंवार पैसे मागूनही आरोपी हा फिर्यादीच्या पतींना उडवा उडवीची उत्तरे देत होता. नागपंचमी सणाच्या दिवशी पैशाची गरज असल्याने फिर्यादीचे पती श्री राऊत यांच्याकडे पैसे मोजण्यासाठी गेले असता एक-दोन दिवसात देतो म्हणून सांगितलं. दरम्यान २८ ऑगस्ट रोजी फिर्यादी व त्यांचे पती घरासमोर उभे असताना मुख्य आरोपी सोबत इतर दोघे फिर्यादीच्या घरासमोरून जात होते त्यावेळी फिर्यादीचे पती यांनी पैसे मागितले असता चिडून जाऊन बाबुराव राऊत त्यांच्यासोबत असलेल्या दोघांनी अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जातीचा उल्लेख करून तुमची दोनच घरे आहेत तुम्हाला गावाबाहेर हाकलून देऊ अशी धमकी दिली. तसेच मुख्य आरोपी बाबुराव राऊत यांने फिर्यादी महिलेच्या पोटात लाथा बुक्क्या मारल्या व केस धरून वाईट उद्देशाने फिर्यादीच्या साडीचा पदर ओढला. याबाबत सविता किशोर डोंगरे वय ४१ राहणार सावखेड भोई यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाबुराव सोनाजी राऊत, ज्ञानेश्वर बबन शेटे, व मंगेश दिलीप राऊत तिघे राहणार सावखेड भोई यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटी कायदा व विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे करीत आहे.



