
तुमच्यामुळे माझी नोकरी गेली… देऊळगाव राजा बाजार समितीत गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध गुन्हा
MH 28 News Live / देऊळगाव राजा : तुमच्यामुळे माझी नोकरी गेली असे बोलून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घालून उपस्थित कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी व साक्षीदार करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा नोंदवला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार फिर्यादी व साक्षीदार नामे कनिष्ठ लिपीक रावसाहेब शामराव कोल्हे, विलास दगडुजी कव्हळे व शिपाई श्रीमती सारीका मिलन राठोड असे कृषी उत्पन्न बाजार समीती देऊळगाव राजा येथील कार्यालयात त्यांचे शासकीय काम करत असतांना आरोपी गणेश सिताराम म्हस्के रा. गिरोली खु | ता. देऊळगाव राजा हा कार्यालयात आला व फिर्यादी ला व साक्षीदारांना शिवीगाळ करुन म्हणू लागला की, ” तुमच्यामुळे माझी नोकरी गेली ” त्यावेळी फिर्यादी च साक्षीदार त्यास समजावुन सांगु लागले असता साक्षीदार रावसाहेब शामराव कोल्हे यांना शर्टाची कॉलर पकडुन चापटाबुक्याने मारहाण करून ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तुम्हाला पाहुन घेतो अशा धमक्या दिल्या. याबाबत किशोर सिताराम म्हस्के रा शिवाजीनगर चिखली यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश सिताराम म्हस्के रा. गिरोली खुर्द ता. देऊळगाव राजा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.



