♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अखेर मिसाळवाडीकरांच्या आंदोलनाला यश; शिक्षकाची नियुक्ती रद्द ! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी चांगल्या शिक्षकाची मागणी

MH 28 News Live /  चिखली ( संजय एस. खेडेकर  )*: तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे वरील शिक्षक दांडगे यांच्या करण्यात आलेल्या नियुक्तीविरोधात गावकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. संतप्त गावकऱ्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीने थेट शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारल्यानंतर, जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ संबंधित शिक्षकाची नियुक्ती अखेर रद्द केली . असल्याची खात्री लाईक माहिती आहे.या निर्णयामुळे गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला असून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

​मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक अनिल दांडगे यांची नियुक्ती या शाळेवर करू नये, अशी स्पष्ट भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले होते. प्रशासना वर असलेल्या राजकीय दबावामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सदर नियुक्ती कायम ठेवली होती. राजकीय दबावामुळे प्रशासनाने ही नियुक्ती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेतील वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी संतप्त गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येत शाळेला थेट कुलूप ठोकले. दांडगे यांची नियुक्ती रद्द न झाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा गावकऱ्यांनी दिला होता.

​गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा आणि संभाव्य आंदोलनाचा भडका लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर माघार घेतली. प्रशासनाने तात्काळ पावले उचलत दांडगे यांची नियुक्ती रद्द केल्याचे जाहीर केले असून तसा आदेश शाळेला लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आलेआहे.
​

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129