
महावितरणमध्ये विविध पदांची नवीन भरती
MH 28 News Live : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च आहे.
एकूण जागा : ६०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) पदवीधर अप्रेंटिस 30
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
2) डिप्लोमा अप्रेंटिस 30
शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: किमान 14 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in