♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

फेस स्कॅनिंगशिवाय पगार नाही ! महसूल कर्मचाऱ्यांसाठी ‘फेस ॲप’ होणार सक्तीचं

MH 28 News Live : राज्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता कामावर हजेरी लावण्यासाठी मोबाईलमधील ‘फेस ॲप’ वापरणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तलाठी, नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदावरील सर्वांनी दररोज सकाळी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून चेहरा स्कॅन करून उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील आढावा बैठकीत ही घोषणा केली. या निर्णयाचा अंमल ऑगस्ट २०२५ पासून होणार असून, फेस ॲपवर हजेरी लावलेल्या कर्मचाऱ्यांनाच सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा केले जाणार आहे. त्यामुळे कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी लावल्याशिवाय पगाराची शक्यता नाही. हे तंत्रज्ञान केवळ चेहरा ओळखण्यातच मर्यादित नसून, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची जागा आणि वेळ जिओ-फेन्सिंगच्या साहाय्याने अचूक नोंदवली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या नेमणुकीच्या गावातच सकाळी ठरावीक वेळेत उपस्थित राहणं अत्यावश्यक ठरणार आहे.

राज्य सरकारने केंद्र शासनाच्या सूचना लक्षात घेऊन महसूल विभागात शिस्तबद्धता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. अनुपस्थित राहिल्यास त्या दिवसाच्या वेतनात थेट कपात केली जाईल. या निर्णयामुळे महसूल विभागात शिस्तीचा नवा अध्याय सुरू होणार असून, कर्मचारी वर्गामध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, प्रशासनाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129