♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जुने रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवा – काँग्रेसची चिखली प्रशासनाला मागणी

MH 28 News Live / चिखली : चिखली येथील १९३० साली बांधलेली तहसीलची जुन्या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक झाली आहे. महसूल व प्रशासनाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज याच इमारतीत असून, नागरिक व कर्मचारी याच ठिकाणी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. या गंभीर स्थितीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसने करत, रेकॉर्ड तातडीने सुरक्षित स्थळी हलवावेत, अशी मागणी केली आहे.

२१ जुलै रोजी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या इमारतीत सन 1930 पासूनचे दस्तऐवज साठवलेले आहेत. मात्र ही इमारत पूर्णतः धोकादायक स्थितीत असून कोणतीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुस्थितीत असलेल्या इमारती “जिर्ण” ठरवून पाडल्या जात असताना, 90 वर्षांहून अधिक जुनी व प्रत्यक्ष धोकादायक असलेली तहसीलची इमारत दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे.

प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास कोणताही अपघात घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या रेकॉर्डसाठी सुसज्ज डिजिटल रूम तयार करून सर्व दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी हलवावेत, तसेच ही इमारत वापराबाहेर काढण्यात यावी, अशी काँग्रेसची स्पष्ट मागणी आहे.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये तालुका काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतरोधीन काजी, दीपक देशमाने, डॉ. मोहम्मद इसरार, कुणाल बोंद्रे, प्रा. निलेश गावंडे, प्रा. राजू गवई, डॉ. संतोष वानखेडे, युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, श्याम पठाडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, अशोकराव पडघान, किशोर कदम, ज्ञानेश्वर सुरूशे, नगरसेवक राजू रज्जाक, विजय गाडेकर, विलास कंटुले, गोपाल देव्हडे, गोकुळ शिंगणे, बिदुसिंग इंगळे, जय बोंद्रे, शिवराज पाटील, विजय जागृत, डॉ. अमोल लहाने, कैलास खराडे, प्रदिप पचेरवाल, अमिनखॉ उमस्मानखॉ, दिपक थोरात, खलील बागवान, शहीजाद अली खान, डॉ. संजय घुगे, अॅड. विलास नन्हई, सचिन शेटे, शेख बबलू, रामेश्वर भुसारी, समद हाजी, प्रमोद रत्नपारखी, रोहण पाटील, विकास लहाने, रामधन मोरे, दत्ता करवंदे, समाधान गिते, नजिर कुरेशी, मनोज जाधव, प्रकाश चव्हाण, कैलास कांडेलकर, गजानन वांजोळ, बाशिद जमदार, भास्कर चांदोरे, शकील भाई, संजय गिरी, शिवा म्हस्के, संजय महाले, आरिफ बागवान, जाकीर शेख, हादी शेख, सादीक जमदार, अकील खान, हाबीब भाई, सोहील शेख, रवि लोखंडे, नितीन वाघ, शेषराव साळवे, प्रदिप साळवे, शेख अजिम, दिनकर जाधव, मनोहर हिवाळे, प्रदिप शेजोळ, भास्कर अण्णा धमक, नंदु आंभोरे, शेषराव आंभोरे, अंबादास वाघमारे, भारत मुलचंदानी, बिबीशन राठोड, गुलाब आंभोरे, परशराम राठोड, सुभाष खरात, कुंदन यंगड, कैलास गायकवाड, दत्तात्रय येवले, सदुनाना ठेंग, विष्णु पाटील, भिमराव हिवरकर, बळीराम इंगळे, नागेश आंभोरे, विष्णु सोळंकी, संजुनाना सोळंकी, समाधान आकाळ, शुभम बुरकुल, लक्ष्मण भिसे, बाळु ढंगारी, प्रथमेश वानखेडे, संदेश वानखेडे, प्रेम वानखेडे, सागर साळवे, व्यंकटेश रिंढे, एन.टी. भुसारी, ज्ञानेश्वर गावंडे, विष्णु गिरे, राजीक कुरेशी, संतोष ठेंग, राहुल चवरे, अजिम खान, आशिष थोरात, दत्तात्रय साळवे, इरियास शेख, समीर शेख, संजय गुंजकर, भारत गायकवाड यांचा समावेश होता.

इमारत बंद करा, रेकॉर्ड हलवा – राहुल सवडतकर

शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर यांनी प्रशासनाला इमारत बंद करण्याची, रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व नवीन डिजिटलीकरण केलेली रेकॉर्ड रूम तयार करण्याची मागणी केली. यासोबतच, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून नवीन इमारतीसाठी तात्काळ योजना हाती घेण्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129