राज्य निवडणूक आयोगाने आखला कार्यक्रम, प्रभाग रचनेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रियेला सुरू
MH 28 News Live : त्यानुसार नगरपरिषद पंचायत समित्या ग्रामपंचायती यांच्या प्रभाग रचनांना अंतिम रूप देण्यात येत आहे या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होण्याची संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने आपला निवडणुकीचा कार्यक्रम आखला असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या प्रभाग रचना बाबत आढावा बैठका सुरू आहेत. तर आता राज्यातील विविध २१६ नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर काम सुरू करण्यात आले आहे. ११ मार्च २०२२ रोजी थांबवण्यात आलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिली.
नगरपरिषदांच्या हरकती आणि सूचना – राज्यातील २१६ नगरपरिषदा नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० ते १४ मे २०२२ दरम्यान हरकती आणि सूचना मागवण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू करावी. जिथे काम थांबले होते तिथून पुढे सुरू करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने चार मे रोजी दिल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे. यात २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायतींचा समावेश आहे. १० ते १४ मे २०२२ दरम्यान याबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्यात करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी २३ मे २०२२ पर्यंत सुनावणी घेणार आहेत. प्रभाग रचनेचे पाठ प्रारूप १० मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या आणि आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांचे एकत्रित सुनावणी करण्यात येणार असल्याचेही सणस यांनी सांगितले.
निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता – राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती आणि नगरपरिषदा तसेच महानगरपालिका यांच्या प्रभाग रचनांच्या हरकती आणि सूचना यांची सुनावणी होऊन ७ जून २०२२ पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कामासाठी आता मनुष्यबळाची गरज लागणार असून तशी विनंती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना नाही करण्यात आली आहे. एकूणच आगामी पावसाचा कालावधी पाहता निवडणुका सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता असल्याचे सणस यांनी संकेत दिले. महानगरपालिकांच्या प्रभाग रचनांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे, तेही अंतिम टप्प्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या कामाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दोन आठवड्यात स्पष्ट करण्यात येईल. मात्र योग्य वेळीच नोटिफिकेशन काढण्यात येईल असेही सणस यांनी सांगितले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button