♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हँकर्सनी केला सायबर हल्ला… महाराष्ट्र सरकारसह ७० वेबसाईट केल्या हँक

MH 28 News Live : ठाणे पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटसह सायबर हॅकर्सनी राज्यातील शासकीय व खासगी अशा सुमारे 70 वेबसाईट्स हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. या वेबसाईट पूर्ववत करण्यासोबत सायबर हल्ल्याबाबत राज्याच्या सायबर विभागाने तपास सुरु केला आहे.

काही सायबर गुन्हेगारांनी चक्क ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी समोर आला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. ठाणे सायबर विभागासह गुन्हे शाखेचे पथक यांनी या घटनेप्रकरणी अथक परिश्रम घेऊन दुपारनंतर पोलिसांची वेबसाईट पुन्हा पूर्ववत केली. दरम्यान, हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश या वेबसाईटवर दिसून आला. इंडोनेशियन डिफासर असे नाव हॅकरने लिहून खाली एक संदेशदेखील लिहिला होता. हा सायबर हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला. रात्रीपासून ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक झाल्याचे समोर आले.

या वेबसाईटवरची सगळी माहिती गायब झाली आहे. या वेबसाईटवर ठाणे पोलीस अधिकार्‍यांची माहिती तसेच त्यांचे मोबाईल नंबर्सही होते. मात्र या वेबासाईटवर सांकेतिक आणि इंग्रजी भाषेत एक संदेश लिहून तो हॅकरने प्रसारित केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली. तसेच अनेक सायबर तज्ज्ञांचा सल्ला घेतला. सायबर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तपासकामी लागले होते. हॅक बाय वन हॅट सायबर टीम असा संदेश या वेबसाईटवर दिसून आला.

इंडोनेशियन डिफासर असे नाव हॅकरने लिहून खाली एक संदेश देखील लिहिला होता. त्यात हॅलो इंडियन गव्हर्नमेंट अँड हॅलो एव्हरीवन, अगेन अँड अगेन यु मेक ट्रबल विथ द प्रॉब्लम ऑफ द इस्लामिक रिलिजन, थिंक यु डोन्ट अंडरस्टॅण्ड टॉलरन्स हं? वी आर टु लेझी टू थ्रीट ट्रेश लाईक यु गाईज, हरी अप अँड अपोलोजाईस टू मुस्लिम ऑल ओव्हर द वर्ल्ड, वी डोन्ट स्टॅण्ड स्टील व्हेन अवर अपोस्टल इज इन्सलटेड असा संदेश लिहिलेला होता.

सायबर विभागाने आणि तज्ज्ञांनी मिळून ही वेबसाईट मंगळवारी दुपारी पूर्ववत सुरू केली. सदर प्रकार कुणी केला याबाबत सायबर सेल व गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करीत असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा धमकी वजा इशारा सायबर हल्लेखोरांनी सरकारला दिला आहे. त्यानंतर शासकीय विभाग, बँका, विद्यापीठे अशा सुमारे 70 अस्थापनांच्या वेबसाईट हॅक झाल्याचे आतापर्यंत समोर आल्याचे सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी सांगितले.

सायबर हल्लेखोरांमध्ये मलेशियाचा आणि इंडोनेशियामधील गट असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्या संस्थांच्या वेबसाइट हॅक झाल्या आहेत. त्यांच्या संपर्कात आम्ही असून या बेवसाईट पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी दिली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129