कोईम्बतूर येथून निघालेली भारतातील पहिली खासगी रेल्वे आज सकाळी शिर्डीत पोहचली. ८१० प्रवाशांनी केला पहिला प्रवास
MH 28 News Live : खागसी रेल्वेच्या सेवेवर समाधानी असल्याच्या प्रति क्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.’भारत गौरव’ योजनेंतर्गत देशातील पहिली खाजगी रेल्वे काल कोईम्बतूर येथून निघाली.
आज सकाळी ती शिर्डीत दाखल झाली.
भारतीय रेल्वेने ही गाडी एका खासगी सेवा प्रदात्याला दोन वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली आहे. ही रेल्वे महिन्यातून तिनदा धावणार आहे. या गाडीची क्षमता १५०० प्रवाशांची आहे. पहिल्या दिवशी ८१० प्रवासी होते.
ही रेल्वे कोईम्बतूर उ(Coimbatore येथून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुटून गुरुवारी सकाळी सात वाजता शिर्डीच्या साई नगर रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. दक्षिणेतून शिर्डीला येणाऱ्या भाविकांची यामुळे सोय होणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button