
सामाजिक कार्यकर्ते अरुण हिंगे यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश
MH 28 News Live, चिखली : शहरामध्ये विविध सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात नियमित अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते अरुण हिंगे व रामेश्वर गवई यांनी दि. ०१ सप्टेंबर २०२२ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सदस्यत्वाची नोंदणी करून जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.
त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, संजय दळवी, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, अंकित इंगळे, नारायण देशमुख, यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button