♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेतकरी मदतीपासुन वंचीत राहणार असल्याने आॅनलाइन कार्यपद्धतीस स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांचा विरोध

MH 28 News Live, चिखली : शासनाने अतिवृष्टिने शेती पिकाचे नुकसान झालेल्या वाशिम ,बुलढाणा या जिल्ह्यातील शेतक-यांसाठी १५७ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु यामधे सुद्धा शासनाने आँनलाइन कार्यपध्दतीचा खोडा घातला असुन अनेक शेतकरी सदरील मदतीपासुन वंचीत राहणार आहेत. शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास विलंभ लागणार असल्याने या कार्यपध्दतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी विरोध दर्शवीला असुन शेतकरी मदतीपासुन वंचीत ठेवायचे नसतील तर पुर्वीपार चालत आलेल्या नैसर्गीक आपत्ती विभागाच्या माध्यमातुनच शेतक-यांच्या खात्यावर चेक स्वरुपात रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी सरनाईक यांनी दि. १२ डीसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तहसिलदार, यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या आक्रमक भुमिकेनंतर मुंबई येथे बैठक बोलवुन वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यातील अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी १५७कोटी रु निधी मंजुर करण्यात आला आहे.परंतु दुसरीकडे मात्र शासनाने प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या धर्तीवर आॅनलाइन प्रणाली महा आयटी कंपनी मार्फत शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. चिखली तालुक्यातील तलाठ्यांच्या याद्या आॅफलाइन पध्दतीने पैसे टाकण्यासाठी तयार असतांना आॅनलाइन कार्यपध्दतीने पैसे खात्यावर टाकण्यासाठी परत शेतक-यांचे आधार कार्ड,मोबाइल नंबर व इंग्रजी भाषेत याद्या तयार करण्याच्या सुचना तहसिलदारांनी तलाठ्यांना दिल्या आहेत.शेतक-यांचे आधार वरील नावामधे स्पेलींग मिस्टेक झाल्यास किवा आधार लिंक नसल्यास सदरील रक्कम खात्यावर जमा झाली नसल्याचे प्रधानमंत्री सन्मान योजनेमधुन उघड झाले आहे.तर आजही ते शेतकरी २०००रु हप्त्यासाठी तहसिल व कृषी कार्यालयाचे या आॅनलाईन प्रणाली मुळे उंबरठे झिजवत आहे.विशेष म्हणजे मृतू मुळे किवा दैनंदिन होणा-या व्यवहारामुळे मालकी हक्कामधे निरंतर बदल होत असतो त्यामुळे सादर माहितीत व अनुदान वितरणाच्या यादित बदल होत असतो उदा एका गावचा विचार केल्यास कमीत कमी१०नावात (७/१२)मधे बदल होतो.तर तालुक्यातील गावे बघता वरील प्रमाणे १५०० शेतक-यांच्या मालकी हक्कामधे बदल होतो हिच परीस्थीती जिल्ह्यात राज्यात असणार आहे.त्यामुळे हजारों शेतकरी या आॅनलाइन पध्दतीमुळे अतिवृष्टिच्या मदतीपासुन वंचीत राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व या पध्दतीमुळे खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंभ लागणार असल्याने शासनाने घेतलेल्या या निर्णयास स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी या आँनलाइन कार्यपध्दतीस विरोध दर्शवीला असुन त्यांनी याबाबत सविस्तर मांडणीचे पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी,तहसिलदार,तालुका कृषी अधिकारी यांना दिले असुन जिल्ह्यासाठी पुर्वीपार चालत आलेल्या आॅफलाइन कार्यपध्दतीचाच वापर करण्यात यावा,व शेतक-यांच्या खात्यावर विना विलंभ मंजुर रक्कम खात्यावर जमा करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. दरम्यान आँफलाइन पध्दतीचा अवलंब न केल्यास व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ऑनलाइन प्रक्रीयेस तलाठी संघटनांचा विरोध

पि एम किसान योजनेचे पैसे मिळावे यासाठी शासनाने इ के वाय सी करुण घेतली व आॅनलाइन पध्दतीचा वापर केला परंतु आजही सन्मान योजने पासुन शेतकरी वंचीत आहेत.तर आता आॅनलाइन पध्दती राबवीली जाणार असल्याने
भविष्या शेतक-यांना अडचण ठरणा-या ऑनलाइन कार्यपध्दतीस अनेक ठीकाणी तलाठी संघटनांनी विरोध दर्शवीला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129