
सावधान…! कोरोनाचे होत आहे पुनरागमन, केंद्र व राज्य सरकार झाले सतर्क
MH 28 News Live : कोरोना संपला, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच आता पुन्हा एकदा या विषाणूने डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
चीनमधील वाढती कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता भारत सरकारनेही सावत पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, केंद्र सरकारकडून सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना पत्र पाठवत बाधितांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेनसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतातील मास्क सक्तीबाबत मोठं आणि सूचक विधान केले आहे. यामुळे राज्यासह देशात पुन्हा मास्क सक्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. भारती पवार म्हणाल्या की, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट मोडवर असल्याचे त्या म्हणाल्या. वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा एकादा मास्क सक्तीची गरज निर्माण झाली आहे. मात्र, या बाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारती पवार यांनी मास्क सक्ती गरजेची असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात टास्क फोर्स नेमणार – फडणवीस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यासह केंद्रातही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. हा टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारला सूचना करणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्बंध लागणार, पुन्हा मास्क लावावा लागणार का, असा प्रश्न जनतेसमोर आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button