
वास्तूशास्त्र तोडगे – नव्या वर्षाची दिनदर्शिका अशी लावल्यास होतील हे फायदे
MH 28 News Live : नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. सर्वजण नव्या वर्षाचे कॅलेंडर आणणार असतील. पण हे कॅलेडर घरी लावण्यासाठी वास्तुशास्त्रात कोणती दिशा योग्य आहे सांगितले आहे. जर वास्तुशास्त्रानुसार कॅलेडर योग्य दिशेने लावल्यास तुमचे भाग्य चमकेल.
वास्तुशास्त्रानुसार अनेकदा घाईघाईने किंवा काही कारणास्तव जुन्या कॅलेंडरच्या वरती नवीन कॅलेंडर लावले जाते. त्यामुळे अनेक दिवस घराच्या भिंतींवर जुनी कॅलेंडर तशीच राहतात. वास्तूमध्ये जुने कॅलेंडर लटकवणे चांगले मानले जात नाही. यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच भविष्याच्या रूपरेषेवरही परिणाम होत असून नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्याची उर्जा कमी आहे. म्हणूनच भिंतीवरून जुने कॅलेंडर काढून नवीन वर्षाचे नवे कॅलेंडर घरात लावावे.
वास्तूनुसार नवीन वर्षात घराच्या उत्तर, पश्चिम किंवा पुर्व भिंतीवर लावणे शुभ मानले जाते. घर, ऑफिस किंवा दुकान इत्यादी ठिकाणी या दिशांना नवीन वर्षांचे कॅलेंडर लावल्यास जीवनात प्रगती होते आणि वर्षभर समस्या दुर राहतात. कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये, असे केल्यास घरातील सदस्याचे आरोग्य निरोगी राहत नाही.