
राज्यात यापुढे अनुदानित शाळा नाहीच, स्वयं अर्थसाहाय्यित शाळांनाच मंजुरी, देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण
MH 28 News Live : राज्यात यापुढे कायद्यानुसारसेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थसाहाय्यित शाळांनाच मंजुरी देता येतील, अनुदानित शाळांना नाही असं स्पष्टीकरण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तसेच जुन्या पेन्शन योजनेबाबतही फडणवीसांनी विरोधी पक्षावर निशाणा साधत धारेवर धरले.
“जुनी पेन्शन योजना राज्यात लागू होणार नाही”
नागपूरात सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून महत्वाच्या विविध मुद्दय़ांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. फडणवीस पुढे म्हणाले, जुनी पेन्शन योजना राज्यात लागू होणार नाही. जर जुनी पेन्शन योजना लागू केली, तर 1 लाख 10 हजार कोटी बोजा वाढेल. शिक्षण दर्जा, खर्च याचा विचार करावा लागेल. मानवतावादी विचार करून आधी परवानगी दिल्या. आता त्रुटी काढल्या, पुन्हा परवानगी मागतात, पण आता देता येणार नाही असं फडणवीस म्हणाले.