कोरोनाच्या वापसीबद्दल खबरदारी घ्येण्याचे पंतप्रधान मोदी यांचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश
MH 28 News Live, : कोरोना अजून संपलेला नाही हे पुन्हा सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे व इतर ठिकाणी दक्षता वाढवावी. राज्यांनी कोरोना आरोग्य निर्देश लागू करण्यासह जीनोम सिक्वेन्सिंग आणि चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, सर्वांनी मास्क आवर्जून वापरावा व ज्येष्ठ नागरिकांच्या बूस्टर लसीकरणावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत दिल्या.
कोरोनाचे व्हेरियंटच्या बीएफ -७ या उप-व्हेरियंटचे चार रूग्ण गुजरातसह तीन राज्यांत आढळून आल्यावर देशभरात आरोग्य दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतली.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची उपस्थिती होती. बैठीकमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा झाली.
आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची योग्य त्या तपासण्या, ऑक्सिजन सिलेंडर, पीएसए प्लांट, व्हेंटिलेटर, रुग्णालयातील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी राज्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, मागील २४ तासांत देशात १२९ नवीन रूग्ण आढळले असून सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३४०८ आहे. एका कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोविडच्या मुकाबल्यासाठी पूर्णपणे तयार राहा. कोरोना अजून संपलेला नाही, अशा शब्दांत आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना दिल्या. राज्य प्रशासनांनी ऑक्सिजन सिलिंडर, आॅक्सीजन प्लांट, व्हेंटिलेटर आणि पायाभूत सुविधांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी ऑडिट तपासणी करण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.
विशेषतः ज्येष्ठ नागरीक आणि आजारी लोकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांनी कोरोना आघाडीवीर व कोरोना योद्ध्यांच्या निस्वार्थ सेवेचेही कौतुक केले. या बैठकीनंतर राज्यांना नवीन दिशानिर्देश जारी केली जाण्याची शक्यता आहे. मास्क आणि सामाजिक अंतरावर भर द्यावा आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान गर्दी रोखण्यासाठी यात विशेष खबरदारीचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button