♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महाराष्ट्रात क्रिप्टो काँईनचा ‘ महाघोटाळा ‘ ? एकट्या चिखली तालुक्यात सुमारे १५०० गुंतवणुकदारांना बसला किमान १५० कोटींचा फटका

MH 28 News Live, चिखली : इझी मनीची क्रेझ अलिकडे वाढत असून ही मानसिकता हेरून अनेक ठगांकडून वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. असाच एक प्रकार काल उघडकीस आला. चिखली शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या एक वर्षांपासून एका क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी मोहीम चालवली गेली. केलेल्या गुंतवणुकीवर चौपटीपेक्षा अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून शहर व ग्रामीण भागातील सुमारे १५०० गुंतवणुकदारांकडून किमान १५० कोटी रुपये या क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक करण्यात आली. काल २५ डिसेंबर रोजी हे क्रिप्टो काँईन चेनवाईज एक्सेजवर ९७६ डाँलर एवढ्या दराने लिस्ट झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर काही वेळात ९७६ वरुन १३१० पर्यंत हे दर उसळले. परंतु तेथून हे दर थेट २१ डाँलरवर येऊन कोसळला. अशा रितीने या क्रिप्टो काँईनची विक्री करतांना प्रमोटर लोकांनी दाखवलेल्या भव्य दिव्य स्वप्नांचा क्षणार्धात ‘ कपाळमोक्ष ‘ झाला. या प्रकारामुळे दीड हजार गुंतवणुकदारांचे किमान १५० कोटी रुपये बुडाले असल्याची भितीदायक शक्यता वर्तवली जात असून या महाघोटाळ्यात फसवणूक झालेले हजारो लोक चक्क रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. हा मोठा गैरप्रकार केवळ चिखली शहरात घडला नसून संपूर्ण महाराष्ट्रात लाखो गुंतवणुकदारांना हजारो कोटी रुपयांचा चूना लागला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

गेल्या वर्ष्याच्या अखेरीस शहरात चार – पाच जणांनी एका क्रिप्टो काँईनचे प्रमोशन करण्याची मोहीम सुरू केली. शहर व ग्रामीण भागातील नोकरदार, व्यापारी, मोठे व्यावसायिक, सधन कास्तकार तसेच लहान मोठे धंदे करून आपला प्रपंच चालवणारे लघु व्यावसायिक अशांना गाठून त्यांना चौपटीपेक्षाही अधिक परतावा मिळणार असल्याचे भव्य दिव्य व्हिजन दाखवले गेले. मार्केटिंगची प्रभावी पध्दत आणि प्रमोटर व एजंटांच्या संबंधातून वर्षभरात सुमारे दीड हजार लोकांनी या क्रिप्टो करंसीमध्ये किमान १५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापैकी निम्मे गुंतवणुकदार चिखली शहरातील असून त्या खालोखाल अमडापूर येथील गुंतवणुकदारांची संख्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

ख्रिसमसच्या पर्वावर झाली सुखस्वप्नांची होळी

सदर क्रिप्टो काँइन २५ डिसेंबर रोजी चेनवाईज एक्सेंज या आँनलाईन स्टाँक मार्केटमध्ये लाँच होणार होता. त्यानुसार काल तो लिस्ट झाल्याचे दाखवले देखील. या क्रिप्टो करंसीची आश्वासक सुरुवात ९७४ डाँलरला एक काँईन अशी झाली. त्यानंतर तो १३१० डाँलवपर्यंत चढला असल्याचे मोबाईल आणि काँम्प्युटरच्या स्क्रिनवर दिसणारे अविश्वसनीय आकडे पाहून हर्षवायू झालेल्या गुंतवणुकदारांचा हा आनंद मात्र क्षणभंगुर ठरला. कारण, दुसऱ्याच मिनिटाला या काँईनचा दर १३१० डाँलरवरून धाडकन २१ डाँलरवर येऊन कोसळला. या प्रचंड धक्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली, त्यात आणखी भर म्हणजे थोड्याच वेळात चेनवाईज एक्सेंज ही वेबसाइट बंद पडली आणि गुंतवणुकदारांना अक्षरशः दरदरून घाम फुटला. काही जणांनी आपल्याला काँईन विकणाऱ्या एजंट आणि प्रमोटरला फोन लावून संपर्क साधावा, परंतु त्यांच्याकडून देखील समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने गुंतवणुकदारांमध्ये घबराट निर्माण झाली असून आपल्या घामाचे पैसे गुंतवणार्या सर्वसामान्य लोकांना आपल्या भविष्याच्या चिंतेने ग्रासले आहे.

अशी होती मार्केटिंग स्टँटजी

या क्रिप्टो करंसीचे नेटवर्क तसे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. चिखली शहरातील चार – पाच प्रमोटर मिळून काही एजंटांना हाताशी धरून इझी मनीचा हव्यास असलेल्या लोकांना पध्दतशीरपणे ‘ गिर्हाईक ‘ बनवण्यात आले. सुरूवातीला एका काँईनचे विक्री मूल्य ३५ डाँलर असे होते. तेथपासून लाँचिंग होण्यापूर्वी हे दर प्रति काँईन ७०० डाँलरपर्यंत पोहचले. ही क्रिप्टो करंसी लोकांच्या माथी मारण्यासाठी पाँश हाँटेलमध्ये मोठमोठे सेमिनार आयोजित केले जात, त्यामध्ये जाणीवपूर्वक झगमगाट आणि थाटमाट केला जात असे. तिथे मोठा बिझनेस करणाऱ्या एजंटांना इनोव्हा, हँरिअर अशा भारी कार बक्षिस म्हणून दिल्या जात असत. त्यामुळे मोठ्या संख्येने या जाळ्यात अनेक लहान मोठे मासे अलगद येऊन फसले. ५० हजारापासून एक लाखापर्यंत रक्कम गुंतवणारे मोठ्या संख्येने आहेत. काही जणांनी तर आपल्याकडील शेती, स्थावर मालमत्ता किंवा दागिने विकून पाच लाखापासून २५ लाखापर्यं आणि ५० लाख व त्यापेक्षा जास्त रक्कम या क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवल्याचे बोलले जात आहे. हेच लोक आता पस्तावत आहेत.

तज्ञ काय म्हणतात ?

मुळात क्रिप्टो करंसीला कोणतीही फंडामेंटल किंवा गव्हर्निंग अँथाँरिटी नसते. यामुळे त्याच्या किमती सहजपणे कमी अधिक करता येतात. यातून गुंतवणुकदारांना फसवणे सहज शक्य असते. याउलट स्टाँक मार्केटमध्ये एक्सेजवर सेबी या सरकारी संस्थेचे नियंत्रण असते, त्यामुळे तिथे असे गैरप्रकार होत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन गुंतवणूक करताना लोकांनी जागरूक राहून आपले कष्टाचे पैसे योग्य ठिकाणीच गुंतवावे व सुरक्षितपणे आर्थिक लाभ मिळवावा असे आवाहन स्टाँक मार्केटचे जाणकार गुंतवणुकदार नारायण भोलवणकर यांनी MH 28 News Live शी बोलताना केले आहे.

या क्रिप्टो करंसीची खरेदी करणार्या गुंतवणुकदारांना त्यांच्याकडे असलेल्या काँइनमधून केवळ ० . ०१ टक्के काँईन विकण्याचीच परवानगी होती. शिवाय, पुढील एक वर्षानंतरच त्यांना हे काँईन पूर्णपणे विकता येतील असे सांगण्यात आले होते. आज वृत्त लिहीपर्यंत एका काँईनचा दर २७ डाँलर असा दाखवला जात असला तरी गुंतवणूक करताना सांगितलेला २ ते अडीच हजार डाँलर प्रति काँईन इथपर्यंत काँईनचा दर पोहचणे ही अशक्य बाब असल्याचे मत क्रिप्टो करंसी आणि स्टाँक मार्केटचे जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे सदर क्रिप्टो काँईनमध्ये पैसे गुंतवून अमाप कमाई करण्याचे सुखस्वप्न पाहणाऱ्या हजारो गुंतवणुकदारांकडे हात चोळत बसण्यापलिकडे आता कोणताही उपाय राहिला नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराची अद्याप पोलीसांकडे तक्रार नोंदवली गेली नसली तरी येत्या काळात काही गुंतवणुकदार यासाठी पुढे येणार असल्याचे सांगितले जाते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129