
Breaking News – बेशिस्त वाहन धारकावर चिखली पोलिसांची कारवाई, ७२ जणांकडून वसूल केला २२ हजार रुपये दंड… ठाणेदार विलास पाटील यांची धडाकेबाज कारवाई
MH 28 News Live, चिखली शहरात डीपी रोड, बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खामगाव चौफुली अश्या मुख्य चौकात बेशिस्तपणे रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर, फॅन्सी नंबर प्लेट, कागदपत्रे न बाळगणे , विनापरवाना वाहन चालविने,वाहनाचे सायलेन्सर मध्ये बदल करणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणारे अश्या एकूण ७२ वाहन धारकांविरुद्ध केसेस करून २२, ००० रुपये दंड करण्यात आला आहे.
पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करुन वाहने डिटेन करण्यात येईल.