
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
MH 28 News Live, बुलडाणा : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
लोकशाही दिनात जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतील. या महिन्यातील लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेण्यात येणार आहे. लोकशाही दिनी तक्रारदाराला स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारदारानी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्रभारी अधिकारी, लोकशही दिन, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नावे पाठवावे.
अर्जदाराने अर्ज करताना अर्ज विहित नमुन्यातील असावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, विहित अर्ज नमून्यात १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करावा.
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व व अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती जोडल्या नसल्यास असे अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.