अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ२०२२ – २३ निधी वितरीत शासन निर्णय
MH 28 News Live : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलासा देणारा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज 6 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. यामुळे या योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव दाखल केलेल्या मात्र अद्याप देखील अनुदान खात्यात नं आलेल्या लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना त्याचप्रमाणे गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना राबवल्या जातात. यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून. या महामंडळाला 275 कोटी रुपयाचे दायित्व आहे.
2022-23 मध्ये आर्थिक विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पित करण्यात आले आहे. यापूर्वी 8 जुलै 2022 रोजी 30 कोटी रूपये तर नोव्हेंबर महिन्या मध्ये या योजनेसाठी मंडळाकरिता 12 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. परंतु या योजना करिता महामंडळाकडे असणारे लाभार्थ्यांचे प्रस्ताव आहे आणि त्याची मागणी या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन. या मंडळा करिता 25 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या अधिनस्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास 100 कोटी रुपये इतके अनुदान 2022,-23 साठी अर्थसंकल्पित केले आहे. त्यातील यापूर्वी 42 कोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
आता वित्त विभागाकडून 25 कोटी इतके अनुदान बीम्स प्रणालीवर उपलब्ध असल्याने ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या शासन निर्णयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेले लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झालेल्या अशा लाभार्थ्यांचा वैयक्तिक कर्ज व्याज loan परतावा त्याचप्रमाणे गाटाचा देखील गट कर्ज व्याज परतावा हा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होण्यासाठी मदत होणार आहे. अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महामंडळासाठी आता 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र या महामंडळाकडे होत असलेली मागणी व आवश्यक असलेला निधी या योजनेकरिता खूप कमी आहे. त्यामुळे बरेच काही लाभार्थी अद्याप देखील अनुदान वितरित झाले असले तरी अनुदानाच्या प्रतीक्षेत राहतील.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button