
वर्धा – बडनेरा – भुसावळ ३१३ कि.मी. लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी, सर्वेक्षण होणार युध्दस्तरावर
MH 28 News Live : रेल्वे प्रवासी गाड्यांची वाढती संख्या आणि मालवाहू रेल्वे वाहतुकीने घेतलेल्या गतीमुळे अस्तित्वात असलेल्या रेल्वेलाइन अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे वर्धा यादरम्यान ३१३ बडनेरा भुसावळ किमी लांबीचा नवा चौथा ट्रॅक साकारला जाणार आहे. बडनेरा येथून जाणाऱ्या नव्या चौथ्या ट्रॅकचे सर्वेक्षण, भूसंपादनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ५. २६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आला आहे.
नागपूर ते वर्धा यादरम्यान नवीन चौथ्या रेल्वेलाइनचे कार्य पूर्ण झाले आहे. हल्ली ब्रिटिशकालीन रेल्वे ट्रॅक वाढत्या प्रवासी असल्यामुळे संख्येनुसार गाड्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. मात्र, रेल्वेलाइन अपुऱ्या पडत असल्याने रेल्वे प्रवासी, मालगाड्यांच्या वाहतुकीला विलंब होत आहे. परिणामी, वर्धा बडनेरा-भुसावळ यादरम्यान नवीन चौथी लाइन टाकली जाणार आहे. यादरम्यान काही भूसंपादन करण्याचे प्रस्तावित आहे. येत्या काही दिवसांतच या चौथ्या ट्रॅकचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती आहे.
ट्रॅकच्या चौथ्या रेल्वे अनुषंगाने भूसंपादनाबाबत जागेची हद्द निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा ही जागा सोडून शेतकऱ्यांनी पेरणी करून पिके घेतल्याचे वास्तव आहे. वॅगन कार्यशाळेच्या बांधकामासाठी ४०. ११ कोटी बडनेरा येथे सुरू झालेल्या वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी अर्थसंकल्पात ४०.११ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती खा. नवनीत राणा यांनी बोलताना दिली.
या ४०.११ कोटी रुपयांतून वॅगन कार्यशाळेच्या बांधकामासह अन्य विकासकामेही केली जाणार आहेत. येत्या काळात वॅगन दुरुस्ती कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे खासदार राणा यांनी सांगितले.
बडनेरातून दरदिवशी ४० मालगाड्या, ३५ प्रवासी ट्रेन धावतात
बडनेरा रेल्वेस्थानकाहून दरदिवशी ४० मालगाड्या आणि ३५ प्रवासी गाड्या धावतात. त्यातुलनेत रेल्वेलाइन अपुरी पडत आहे. रेल्वे गाड्या नियमित आणि वेळेत धावण्यासाठी जादा ट्रॅकची गरज असल्यामुळेच वर्धा बडनेरा-भुसावळ असा नवा चौथा ट्रॅक साकारला जाणार आहे. भविष्यात हा चौथा ट्रॅक नागपूर ते मुंबई असा सलग जोडण्याची रेल्वे विभागाची तयारी आहे.
शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळेल
वर्धा बडनेरा भुसावळ यादरम्यान नव्याने चौथी रेल्वे लाइन साकारली जाणार आहे. सर्वेक्षणदेखील होणार असून, यादरम्यान काही जागा संपादन केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला देण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने चालवल्याची माहिती आहे, तशी पूर्वसूचना शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.