♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

देऊळगाव महीमध्ये होत आहे ग्राम क्रीडा संकुल; बांधकामास झाली सुरूवात

MH 28 News Live, बुलडाणा : देऊळगाव राजा तालुका क्रीडा संकुलांतर्गत देऊळगाव मही ग्राम क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात मैदान सपाटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते रविवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी पार पडले.

भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देऊळगांव मही ग्रामच्या सरपंच वंदना शिंगणे, तहसीलदार शाम धनमणे उपस्थित होते. आमदार डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नातून ग्राम क्रीडा संकुलासाठी देऊळगाव मही येथील २ हेक्टर जागा क्रीडा सुविधा उभारणीकरीता प्राप्त झाली आहे. त्यानुसार ग्राम क्रीडा संकुल मैदानाच्या क्रीडाविषयक विकास करावयाचे दृष्टीने सन २०२२ – २३ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मैदानाच्या सपाटीकरणासाठी ७ लाख रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

येत्या काळात विविध क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. क्रीडांगणावर २०० मीटर, ४०० मीटर धाव मार्ग, क्रीडांगणाभोवती भिंत, तारेचे कंपाऊंड, क्रीडांगणावर विविध खेळांचे मैदान, क्रीडांगणावर प्रसाधनगृह, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, क्रीडांगणावर भांडारगृह, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा, क्रीडा साहित्य, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था, प्रेक्षक गॅलरीवर, आसन व्यवस्थेवर शेड, क्रीडांगण भोवती ड्रेनेज व्यवस्था, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर, आदी क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129