♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सुनील वायाळ यांची राज्य ग्रंथालय परिषद सदस्यपदी निवड

MH 28 News Live / चिखली : सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सुनील वायाळ यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा राज्य ग्रंथालय परिषद समितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

सुनील वायाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक ग्रंथालय चळवळीत विविध पदांवर कार्य केले आहे. जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरीय स्तरावर त्यांनी कामगिरी बजावली असून, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय नियम व अधिनियम कायदा दुरुस्ती समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या लेखनातूनही या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान झाले असून, त्यांच्या दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतील अनेक लेख वाचनप्रेमींच्या पसंतीस उतरले आहेत.

ग्रंथालय सेवेसाठी सुनील वायाळ यांना यापूर्वी कै. अॅड. त्र्यंबकदासजी झवंर स्मृती राज्यस्तरीय “आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता-ग्रंथमित्र पुरस्कार” (लातूर, २०२१) तसेच स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार राज्यस्तरीय “सेवा गौरव पुरस्कार” (परभणी) प्राप्त झाले आहेत. ते “ग्रंथालय भारती” या संघटनेचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत असून वाचनसंस्कृती वृद्धिंगत व संवर्धनासाठी ते पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहेत.

गेल्या वीस वर्षांच्या कालखंडानंतर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व ना. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ग्रंथालय परिषद समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील वायाळ यांच्या कार्याची राज्य शासनाने दखल घेतली असून त्यांची सदस्य म्हणून निवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर, कार्याध्यक्ष रवींद्र पांडे, सहसचिव डॉ. शिल्पा रसाळ, डॉ. अभय टोंगो, यशवंतराव पाटील, चंद्रकांत जोशी, डॉ. प्रा. ब्रिजवाशी, गुलाबराव मगर, अशोक वाडीकर, डॉ. अनुजा कुलकर्णी तसेच पाठक ग्रंथालय चळवळीतील बांधवांनी सुनील वायाळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129